महाविद्यालयामध्ये मराठी विभाग २००० पासून
महाविद्यालयात स्थापन करण्यात आला. अर्थात स्थापना काळापासून या विभागाच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि साहित्यामध्ये रुची निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
प्राचार्य डॉ. गणेश टाले हे महाविद्यालयाच्या स्थापनेपासून विभाग प्रमुख म्हणून
कार्यरत आहेत. एक उत्तम शिक्षक व एक उत्तम
प्रशासक म्हणून महाविद्यालयाच्या स्थापनेपासून त्यांनी एका रोपट्याचे
वटवृक्षात रुपांतर केले आहे. सुरुवातीपासून महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मराठी
साहित्य शिकायला मिळावे आणि रोजगाराच्या संधीं उपलब्ध व्हाव्या यासाठी मराठी
साहित्याचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि
धामणगाव रेल्वे च्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवीची सुविधा
उपलब्ध करुन देण्यासाठी प्राचार्य डॉ. गणेश टाले यांनी मराठी विभाग सुरु केला. ते संत
गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती चे मान्यवर संशोधन पर्यवेक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण
३ विद्यार्थी पीएच.डी. चे संशोधन करीत आहेत.
तसेच आदिवाशी व भटके यांची आत्मकथने, सूर्यकळा (कवितासंग्रह), समीक्षेची
विचारशिल्पे (समीक्षाग्रंथ) अशी त्यांची ३ पुस्तके प्रकशित आहेत. मराठी विभाग प्रमुख म्हणून प्राचार्य डॉ. गणेश
टाले सतत प्रयत्नशील असतात. शिक्षणाचा दर्जा उंचवावा म्हणून त्यांच्या प्रयत्नातून
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे पीएच.डी. चे मान्यताप्राप्त संशोधन केंद्र
महाविद्यालयामध्ये आहे. प्राचार्य डॉ. गणेश टाले हे अनेक शैक्षणिक परिषदा, संशोधन समिती आणि अनेक विद्यापीठ समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. संत गाडगे बाबा
अमरावती विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळ सदस्य आहेत. त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय सेमिनार, परिषदामध्ये रिसोर्स पर्सन
म्हणून भूमिका पार पार पडली आहे. तसेच इतर
साहित्यिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. ते सतत वर्तमानपत्र, मासिके,
साप्ताहिके आणि दिवाळी अंकामध्ये लिखाण करतात.
मलेशिया येथे पार पडलेल्या साहित्यिक संमेलनांचा कवी म्हणून निमंत्रित
होते. त्यांच्या कवितांनी अनेक पुरस्कार प्राप्त
केले आहेत.
No comments:
Post a Comment